Gujarat : गुजरातमधील काडी पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा विजय, काँग्रेसचा दारुण पराभव
गुजरातच्या काडी विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला आहे. सोमवारी झालेल्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार राजेंद्र चावडा यांनी काँग्रेसचे रमेश चावडा यांचा ३९,४२७ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. राजेंद्र चावडा यांना एकूण ९९,७०९ मते मिळाली, तर रमेश चावडा यांना ६०,२८२ मते मिळाली. या विजयामुळे गुजरात विधानसभेत भाजपला आणखी बळकटी मिळाली आहे.