मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा नियोजनपूर्वक “तडकाफडकी” राजीनामा; अशांत मणिपूरला दिली राजकीय तोडग्याची दिशा!!
दिल्ली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार या विषयावर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू असताना तिकडे पूर्वोत्तर राज्य मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी नियोजनपूर्वक तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे मणिपूर राजकीय तोडग्याच्या दिशेने निघाल्याचे स्पष्ट झाले.