Mamata Banerjee : बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना ११ कोटींची नोटीस पाठवली, आणखी ३ नेते रडारवर
श्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि राज्यपालांमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कुणाल घोष आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. बोस यांनी पाठवलेल्या या नोटीसमध्ये सर्व नेत्यांना सांगण्यात आले आहे की तुम्ही राज्यपालांची बदनामी केली आहे. जर या संदर्भात तात्काळ माफी मागितली नाही तर त्यांच्यावर प्रत्येकी ११ कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला जाईल.