Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत पक्षाची एक महत्त्वाची बैठक झाली. बैठकीत देशभरातील तळागाळातील संघटना मजबूत करण्याची आणि संविधानाच्या रक्षणासाठी जनआंदोलन चालवण्याची घोषणा करण्यात आली. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) चे सरचिटणीस, प्रभारी आणि आघाडीच्या संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.