Terrorists : धर्म विचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारले!
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याबाबत दिल्ली जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचे निवेदन समोर आले आहे. त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि म्हटले की, ‘पहलगाममध्ये निष्पाप लोकांच्या हत्येने आपला विवेक हादरवून टाकला आहे. संपूर्ण देश या भयंकर गुन्ह्याचा एकमताने निषेध करतो.