Rahul Gandhi : वीर सावरकरांवरील विधान बेजबाबदार असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले!
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्यावरील राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील स्वातंत्र्यसैनिकांवर बेजबाबदार भाष्य स्वीकारले जाणार नाही.