Ram temple राम मंदिरावर ग्रेनेड हल्ल्याचा कट; हरियाणा-गुजरात पोलिसांनी ISI दहशतवाद्याला केली अटक
हरियाणातील फरीदाबाद येथून अटक करण्यात आलेला दहशतवादी अब्दुल रहमान (19) हा अयोध्येतील राम मंदिरावर हँड ग्रेनेडने हल्ला करण्याचा कट रचत होता. तो फैजाबादहून फरिदाबादला फक्त हँड ग्रेनेड आणण्यासाठी आला होता. त्याला परत येऊन हल्ला करायचा होता. तो हे सर्व काम पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सूचनेवरून करत होता. आयएसआयच्या हँडलरने त्याला हँड ग्रेनेडही दिले होते. तो बदललेल्या नावाने फरिदाबादमध्ये लपला होता.