Air India : एका दिवसात एअर इंडियाची 7 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द; DGCAची सूचना- सुरक्षा आणि ऑपरेशन्सवर लक्ष द्या
मंगळवारी एअर इंडियाच्या ७ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. यामध्ये अहमदाबाद-लंडन, दिल्ली-पॅरिस, दिल्ली-व्हिएन्ना, लंडन-अमृतसर, दिल्ली-दुबई, बंगळुरू-लंडन या विमानांचा समावेश आहे. याशिवाय, सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या विमानातील प्रवाशांना कोलकाता विमानतळावर उतरवण्यात आले.