PM Modi : इराण-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पुढाकर घेत केलं ‘हे’ काम
इराण-इस्रायल युद्ध सुरू होवून दहा दिवस झाले आहेत. १३ जून रोजी सुरू झालेल्या या युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. काल रात्री अमेरिकेनेही या युद्धात उडी घेतली. अमेरिकेने इराणच्या अणु तळांवर हल्ला केला आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी एक मोठा पुढाकार घेतला आहे.