Eknath Shinde ; उद्धव ठाकरे यांच्या भाषणात मात्र केवळ सत्ता, खुर्ची आणि स्वार्थाची मळमळ! एकनाथ शिंदे यांनी सांगितला ठाकरे बद्दलच भाषणातील फरक
वरळी येथे झालेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या मेळाव्यावर टीका करताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक दाखवून दिला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणातून मराठी भाषेबाबतची तळमळ दिसली, पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणात मात्र केवळ सत्ता, खुर्ची आणि स्वार्थाची मळमळ होती, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केला.