Devendra Fadnavis : महाराष्ट्र लवकरच भारताच्या एआय अन् तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल – देवेंद्र फडणवीस
नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नॅसकॉमचे श्रीकांत वेलामकन्नी यांनी मुलाखत घेतली. या चर्चेदरम्यान, महाराष्ट्र लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल तसेच राज्य शासन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करून प्रशासन आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.