Nagpur एच एस ह्युसंग कंपनीची नागपूरात १७४० कोटींची गुंतवणूक; ४०० युवकांना रोजगार!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि दक्षिण कोरियाच्या एच एस ह्युसंग ऍडव्हान्स्ड मटेरिअल्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नाक यांग सीआँग यांच्यामध्ये बुटीबोरी, नागपूर येथे ॲडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादनासंदर्भात १७४० रुपये कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. Nagpur