Devendra Fadnavis : राज्यात 30 हजारांवर रोजगार निर्मिती होणार; 1660 पेट्रोल पंप सुरू होणार, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्र्यांचा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात जवळपास 1660 पेट्रोल पंपांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एक खिडकी’ सुरू करण्याचा देखील निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.