• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Maharashtra : महाराष्ट्रात हवामान विभागाचा इशारा : पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांमध्ये वादळ, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

    राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हैदोस घातला होता. रस्ते पाण्याखाली गेले, घरे कोसळली, शाळा बंद राहिल्या आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात लोकांचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत झाले होते. आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवामान विभागाने नवीन इशारा दिला आहे.

    Read more

    Fadnavis पृथ्वीराज चव्हाण कुटुंबातील ९ मतदारांची दुबार नावे; खरे व्होट चोर समोर, राहुल यांनी उत्तर द्यावे- मुख्यमंत्री फडणवीस

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील ९ जणांची कराड (जि.सातारा) विधानसभेच्या मतदार यादीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नावे असल्याचा आरोप कराडचे भाजप आमदार अतुल भोसले यांनी केला.

    Read more

    शक्ती संवादातले चिंतन महिला विषयक धोरणात परावर्तित करायची ग्वाही मुख्यमंत्री देतात तेव्हा…

    राष्ट्रीय महिला आयोगाने एक व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन जो शक्ती संवाद सुरू केलाय, त्याचा दुसरा उपक्रम मुंबईत होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शक्ती संवादाच्या निमित्ताने झालेले चिंतन महिलाविषयक धोरणात परावर्तित करण्याची ग्वाही दिली.

    Read more

    Chagan Bhujbal : महायुतीमधील नेत्यांनाच भुजबळ जड झालेत ?

    अनेक महिने होऊन गेले तरी नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अजूनही सुटत नाहीये. मात्र नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुती मधील नेत्यांमध्येच रस्सीखेच चालू असल्याचं दिसून येतंय. पालक मंत्री पदासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील पालकमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. परंतु शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांना विरोध केला आहे. 

    Read more

    vice president : आघाडीच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारावर नक्षलवादी कनेक्शन असल्याचा आरोप !

    देशात लवकरच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूका होण्याची शक्यता आहे. अशातच इंडिया आघाडीच्या वतीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी मिळालेली आहे. परंतु रेड्डी यांचे नक्षलवादी गटांशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर केले जात आहेत.

    Read more

    Pune : पुण्यातील बहाद्दराने चक्क दिल्लीला जाऊन भरला उपराष्ट्रपतीपदाचा अर्ज !

    सध्या देशात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत सतत काही ना काही चर्चा सुरूच आहेत. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही पुढील महिन्यात होणार असल्याने एनडीए व इंडिया आघाडी या दोघांनी आता आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र या निवडणुकीसाठी चक्क पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या एका तरुणाने देखील अर्ज दाखल केला आहे.

    Read more

    Anjali Damania : कृषी घोटाळ्याप्रकरणी अंजली दमानियांचा गंभीर आरोप- धनंजय मुंडेंनी व्ही. राधांच्या रिपोर्टची फाइल गायब केली!

    धनंजय मुंडे यांनी कृषी विभागातल्या भ्रष्टाचाराची आणि गौडबंगालाची फाइल गायब केली आहे, असा आरोप आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या कृषी विभागावरचे आरोप चर्चेत आलेत.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंचे फडणवीसांना आवाहन- अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा; माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? बुडणारी शहरं वाचवा!

    अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहररावर आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. फडणवीस यांची आजची घेतलेली भेट याच प्रमुख प्रश्नांसाठी होती. त्यासाठी आपण एक छोटासा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांना दिल्याचे राज म्हणाले.

    Read more

    Anjali Damania : अंजली दमानियांनी केले भाकीत- सप्टेंबरनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; शिंदेंचा भाव वाढणार, राज भाजपसोबत जातील

    आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काही मोठे दावे केले आहेत. सत्ताधारी एनडीएमध्ये सध्या सर्वकाही सुरळीत नसल्याचे दिसत असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावरही होईल, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. शिवाय सध्याच्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांचा भाव वाढेल परंतु सप्टेंबरनंतर काय होईल सांगता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.

    Read more

    आगमना आधीच गणरायाची कृपादृष्टी; सरकारी नोकरदारांचा 26 ऑगस्टलाच पगार; आर्थिक तंगी टाळण्यासाठी फडणवीस सरकारचा निर्णय

    महाराष्ट्रातल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर श्री गणरायाने आगमना आधीच कृपा केलीय. राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारकांना फडणवीस सरकारने खुशखबर दिली.

    Read more

    सत्तेच्या कामासाठी संघ स्पृश्य; पण सामाजिक कामासाठी अस्पृश्य; यशवंत + पवार संस्कारांचा पुरोगामी ढोंगी स्पर्श!!

    सत्तेच्या कामासाठी संघ स्पृश्य, पण सामाजिक कामासाठी अस्पृश्य; यशवंत + पवार संस्कारांचा पुरोगामी ढोंगी स्पर्श!!, असं म्हणायची वेळ शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवारांच्या एका ट्विट मुळे आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर रोहित पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी संस्कारांची आठवण करून देणारे ट्विट केले. त्यांनी त्यात अजित पवारांना टोले हाणले. जणू काही अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या संघाच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे “फार मोठे पाप” घडले, असा आव रोहित पवारांनी त्या ट्विट मधून आणला. त्या ट्विटला यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या “पुरोगामी संस्कारांची फोडणी” दिली.

    Read more

    Sushma Andhare : अंधारेंना काही ‘बेस्टचा’ पराभव पचवता येईना !

    बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंचा दाणून पराभव झालेला आहे. ठाकरे बंधूंची उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाहीये. मात्र ठाकरे बंधूंच्या नेत्यांना हा पराभव पचवता आलेला नाहीये.

    Read more

    बेस्टची निवडणूक “छोटी” आणि “किरकोळ” होती; ही पश्चात बुद्धीची सोयीची मखलाशी!!

    बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकी करून देखील ते हरले. त्यानंतर भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांनी विजय उत्सव साजरा केला तर ठाकरे बंधूंनी ती निवडणूक किरकोळ आणि छोटी असल्याची मखलाशी केली. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी शशांक राव यांना आतून मदत केली होती त्यामुळे शशांक राव यांचे चर्चेत नसलेले पॅनल जिंकून आले, असे विश्लेषण मराठी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंनी सांगितलं फडणविसांना भेटण्याचं कारण !

    आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर भेटीचे कारण नक्की काय? यावरून राजकीय चर्चांना उधाण आले. मात्र आता स्वतः राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.

    Read more

    Akshay Kumar : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना पुणे न्यायालयाचा दणका; नेमकं काय आहे प्रकरण?

    अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलेलबी ३’ हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. गेल्या आठवड्यात निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला. मात्र रिलीज पूर्वीच हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे.

    Read more

    NCW : महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचा मुंबईत दोन दिवस शक्ती संवाद; सर्व राज्यांच्या महिला आयोगांचा सहभाग; मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन

    महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षण या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने पुढाकार घेतला असून राष्ट्रीय महिला आयोगाचा महिला सक्षमीकरणासाठी मुंबईत दोन दिवस शक्ती संवाद आयोजित करण्यात आला आहे.

    Read more

    Raj Thackeray बेस्ट साेसायटी निवडणुकीत दारुण पराभवानंतर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, उत्तर देताना संजय राऊतांच्या नाकीनऊ

    ठाकरे बंधू एकत्र येऊनही बेस्ट साेसायटीच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने प्रस्तावित शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : ठाकरेंनी राजकीयकरण केल्याने जनतेने नाकारले; बेस्ट निवडणूक निकालावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना, विविध विषयांवर भाष्य केले. विशेष म्हणजे, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीवर भाष्य करत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. ठाकरे बंधूंनी या निवडणुकीचे राजकीयकरण केले, त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले, अशी टीका त्यांनी केली. तसेच संजय शिरसाट सिडको अध्यक्ष असताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.

    Read more

    Maharashtra Police : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: महाराष्ट्र पोलिस दलात 15,631 पदांची मेगा भरती; शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मंजुरी

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने 12 ऑगस्टच्या बैठकीत 15,631 पदांची पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार गृह विभागाने पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यास मंजुरी दिली असून, यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

    Read more

    Maharashtra Govt : पालकमंत्र्यांच्या अधिकारांवर मर्यादा; डीपीडीसीच्या निधी वाटपातील मनमानीला चाप, राज्य सरकारचे नवे धोरण मंजूर

    महायुती सरकारमध्ये जिल्ह्यांच्या पालकमंत्री निवडीवरून सुरू असलेला वाद अजूनही कायम असताना, सरकारने पालकमंत्र्यांच्या अधिकारांवर मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधी वाटपावर पालकमंत्र्यांची संपूर्ण पकड होती. कोणत्या प्रकल्पाला किती निधी द्यायचा, कोणत्या आमदारांच्या मागण्यांना प्राधान्य द्यायचे, हे ठरवण्याचे सर्वाधिकार त्यांच्या हातात होते. मात्र, पालकमंत्र्यांच्या या मनमानीवर आता सरकारने लगाम घालण्याचा निर्णय घेतला असून, निधी वाटपाच्या नवीन धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.

    Read more

    Mahadev Jankar : शरद पवारांच्या समर्थनार्थ आले महादेव जानकर, म्हणाले- ओबीसी हिताचा निर्णय त्यांनीच घेतला

    महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटणार आहे. 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईकडे मोर्चा वळवणार आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक नेते शरद पवारांना लक्ष्य करतात. त्यात आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने शरद पवारांवर टीका करताना दिसून येतात. परंतु, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री महादेव जानकर यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांवर पलटवार केला आहे.

    Read more

    Thackeray brothers : एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना ‘बॅलेट पेपर’वरही भाेपळा, बेस्ट साेसायटीत दारुण पराभव

    मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट- मनसे युतीची लिटमस टेस्ट मानल्या जात असलेल्या बेस्ट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत दाेन्ही ठाकरे बंधूंना माेठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ‘उत्कर्ष’ पॅनलचा दारुण पराभव झाला. 21 पैकी एकही जागा मिळवता आलेली नाही. दुसरीकडे, शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकत एकहाती यश संपादन केले. महायुतीच्या पॅनलला 7 जागांवर समाधान मानावे लागले.

    Read more

    बेस्ट पतपेढीची निवडणूक जिंकल्यानंतर शशांक राव + प्रसाद लाड यांना नेमले भाजपने स्टार प्रचारक; मुंबईत आशिष शेलारांनी तयार केले political buffer!!

    मुंबईमध्ये बेस्ट कामगारांच्या पतपेढीची निवडणूक जिंकल्यानंतर महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बेस्टची निवडणूक जिंकणारे शशांक राव यांना आणि ज्यांच्या पॅनलला त्यांनी पराभूत केले

    Read more

    Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला १२ वर्ष ; मास्टरमाइंड मात्र अजूनही सापडेना

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज १२ वर्षे पूर्ण झाली. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील ओंकारेश्वर मंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर उर्वरित तिघांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

    Read more

    Balasaheb Thorat : देशाच्या निवडणूक आयुक्तांनी स्वतःचा पक्ष काढावा; बाळासाहेब थोरात यांचा निवडणूक आयोगाला टोला

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना स्वतःचा राजकीय पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे. देशाचे निवडणूक आयुक्त एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासारखे बोलत आहेत. त्यांची बोलण्याची पद्धत पाहता ते जनतेसाठी काम करतात असे वाटत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढावा, असे ते म्हणालेत. दरम्यान, मी गांधी नाही, पण विचारांसाठी बलिदान स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असेही ते यावेळी कीर्तनकारक संग्राम भंडारे यांनी दिलेल्या धमकीवर भाष्य करताना म्हणाले.

    Read more