Manoj Jarange : मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करायला हायकोर्टाने केली मनाई; पण जरांगेंनी केली फडणवीसांवर आगपाखड!!
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या धामधुमीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवून मुंबईत आंदोलनाचा आग्रह धरणाऱ्या मनोज जरांगे यांना मुंबई हायकोर्टाने चपराक हाणली. पुढच्या 15 दिवसांमध्ये मुंबईत आंदोलन करता येणार नाही. आंदोलन करायचे असल्यास नवी मुंबई किंवा ठाणे परिसरात सरकारने त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने राज्य शासनाला दिले. पण या सगळ्याचे खापर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले. सरकारनेच खोटी माहिती कोर्टात दिली म्हणून कोर्टाने तसा निर्णय दिला, असा दावा जरांगे यांनी केला.