Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य; ढेकळांचे पंचनामे करायचे आहेत का?
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आता ओळख निर्माण झालेले देवेंद्र फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न केला आहे. काढलेल्या पिकाचा पंचनामा केला जाणार नाही. तिथे ढेकळांचे पंचनामा करायचे आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना विचारला आहे.