मराठीचे स्वाभिमानी दिल्लीश्वरांसमोर झुकले; मुंबईचे सगळे प्रश्न मिटल्यामुळे कबुतरांवरून आंदोलन पेटले!!
मराठीचे स्वाभिमानी दिल्लीश्वरांसमोर झुकले; मुंबईचे सगळे प्रश्न मिटल्यामुळे कबुतरांवरून आंदोलन पेटले!!, हे आजच्या दिवसभरातल्या बातम्यांचे सार ठरले.
मराठीचे स्वाभिमानी दिल्लीश्वरांसमोर झुकले; मुंबईचे सगळे प्रश्न मिटल्यामुळे कबुतरांवरून आंदोलन पेटले!!, हे आजच्या दिवसभरातल्या बातम्यांचे सार ठरले.
कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेजच्या बांधकामात आणि प्रस्तावित उंची वाढीतील कथित अनियमिततेची केंद्राने अधिकृत चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कर्नाटकच्या एकतर्फी कृतींमुळे संभाव्य पूर धोका आणि पाणी व्यवस्थापन आव्हाने अधोरेखित केले होते. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा येथील नांदणी मठातील माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजप नेते परिणय फुके यांनी शिवसेनेचा बाप मीच असे शिवसेनेबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. दरम्यान फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. फुके यांनी माफी मागावी अन्यथा, शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा या पत्रकार परिषदेमधून शिवसेनेनं फुके यांना दिला गेला होता. आता राज्यभर आरोप प्रत्यारोपांच्या चौफेर फैरी झाल्यानंतर भाजप नेते परिणय फुके यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणामुळे राज्यात येत्या पाच वर्षात 1.25 लाख उद्योजक घडतील आणि 50 हजार स्टार्टअप्स् सुरू होतील असे नियोजन आहे. तसेच वाढवण बंदर (तवा) ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग (भरवीर येथे) यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांना गणेशोत्सव, दिवाळी, आणि इतर सणांमध्ये मिळणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेला यंदा ब्रेक लागणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे की, ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ४५,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्यामुळे आनंदाचा शिधा पुरवणे यंदा शक्य होणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुपम खेर यांच्यावर चक्क चोरीचा आरोप केला आहे. अनुपम खेर यांनी माझा डायलॉग चोरलेला आहे, ते म्हणाले ‘मी पुन्हा येईन’ याचा कॉपीराइट माझ्याकडे आहे, असे मुख्यमंत्री यांनी म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला.
खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच जोरदार वादात अडकला आहे. ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर काही सामाजिक संघटनांकडून त्यातील मजकुरावर आक्षेप घेण्यात आला असून, हिंदू महासभेने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत सेन्सॉर बोर्ड आणि निर्मात्यांना पत्रही दिले आहे.
माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याविरोधात 2016 मध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. शिरपूर येथील डॉ. मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 499 (मानहानी) आणि 500 (मानहानीसाठी शिक्षा) अंतर्गत 12 ऑगस्ट 2016 रोजी फिर्याद दाखल केली होती.
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मोठा आरोप केला आहे. मुंबईत गृहनिर्माण जिहाद केला जात असल्याचा आरोप शिवसेना नेत्याने केला आहे. संजय निरुपम म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली मुस्लिम बिल्डर आणि डेव्हलपर्स मुंबईची लोकसंख्या बदलत आहेत. हिंदूंची घरे खरेदी करून आणि बेकायदेशीरपणे अतिरिक्त घरांची नोंदणी करून मुस्लिम लोकांचे वसाहत केले जात आहे. एसआरएच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि अहवाल शेअर केला.
वनतारातली माधुरी हत्तीण आणि कबुतरांचे दाणे हे विषय मराठी माध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी अशा पद्धतीने लावून धरले की जणू काही महाराष्ट्रातले सगळे प्रश्नच सुटून गेलेत!!
अलीकडेच मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद करत कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ न टाकण्याचे आवाहन केले आहे. मात्र खायला मिळत नसल्याने कबुतरांचा मृत्यू होऊ लागल्याचं सांगत, जैन समाजाने यावर आक्रमक भूमिका घेतली. तसेच राज्य सरकारने मुंबईतील कबुतरखाने तडकाफडकी बंद करु नयेत, असा प्रस्तावही मांडला.
काँग्रेसने फक्त नेते पोसले, संघटनेकडे केले. दुर्लक्ष सतेज पाटलांच्या तोंडून बाहेर आले सत्य!! सतेज पाटलांनी एका मुलाखतीत काँग्रेस विषयी परखड मते व्यक्त केली. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसने फक्त नेते पोसल्याचे सांगितले. त्याचवेळी काँग्रेसचे संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याचेही कबूल केले.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. माजी महसूल मंत्री तसेच तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे, यांच्याविरोधात सन २०१६ मध्ये केलेले आरोप हे सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमानिया यांच्यासाठी आता अडचणीचं कारण ठरू शकतं.
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युती बाबत अद्याप थोडी प्रतीक्षा करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, 20 वर्षांनंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मतभेद मिटवून एकत्र येण्याच्या सूचना सर्वांना केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मराठी – अमराठीच्या मुद्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना आपले तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्रात मराठी व अमराठी माणूस सुरक्षित आहे. इथे कोणताही वाद नाही. काहीजण या प्रकरणी मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मराठी जनता त्यांना निवडणुकीत त्यांची योग्य जागा दाखवेल. त्यामुळे दुबे यांनी या प्रकरणी कोणतीही विधाने करून नयेत, असे त्यांनी म्हटले आहे.
महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक मंत्री आपल्या कृती आणि विधानांमुळे विरोधकांच्या हातात मुद्दे देत आहेत. अलीकडेच आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आणला. त्यानंतर मंत्री मेघना बोर्डीकर यांचा ग्रामसेवकाला धमकी देतानाचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला. यामुळे रोहित पवार आणि मेघना बोर्डीकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी उफाळून आली आहे.
महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहेत. तसेच मुंबई महापालिका समोर ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आता इंडिया आघाडीची बैठक राजधानी दिल्लीत होणार असून उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कथित सनातनी दहशतवादाच्या मुद्यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचा शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांना पुढे करून देशात सनातनी दहशतवादाचा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा प्रयत्न उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? की त्यांनी आव्हाडांपुढेही गुडघे टेकलेत? अशी विचारणा भाजपने या प्रकरणी केली आहे.
काही लोक कार्यकर्त्यांना कस्पटा सारखे वागवितात, घरगडी समजतात त्यांना जनतेने जागा दाखवून दिली, मातांसाठी आता किती लाचारी पत्करणार, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ता. ४ हिंगोली येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
मराठी आणि हिंदी भाषिक वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत संतुलित आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. मराठी माणूस संकुचित नाही, तो संस्कारी आहे, अभिमानी आहे; मात्र हिंसक नाही, असे सांगत त्यांनी राज्यात सुरू असलेल्या भाषिक वादावर भाष्य केले. जो कोणी मुंबईत येईल, त्याचे स्वागत आमचा महाराष्ट्र करेल. तसेच भाषेच्या किंवा धर्माच्या आधारे कुणालाही लक्ष्य करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस सरकार मध्ये राहून पवार संस्कारितांच्या गेमा; भाजपच्या मंत्र्यांना बदनाम करा!!, असला प्रकार फडणवीस सरकार मधल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी समोर आणला. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे विधवा महिलांना देण्यात अडथळा आणणाऱ्या ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा मेघना बोर्डीकर यांनी वापरली होती. पण त्या कार्यक्रमाचा अर्धवट व्हिडिओ अजित पवारांच्या नेत्याने आमदार रोहित पवारांना दिला, असा धक्कादायक खुलासा मेघना बोर्डीकर यांनी केला. बोर्डीकरांनी पवार संस्कारितांना expose केले.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्यापासून राज्याचे तात्कालीन अन्न व नागरीपुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला होता
गेल्या 7 वर्षांपासून निवडणुकांच्या प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला. एका याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालायने नव्या प्रभार रचनेसह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची धक्कादायक बातमी रविवारी समोर आली. या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही या प्रकरणी पुणे पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंदवून घेतलेला नाही. यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.