Bawankule : राहुल गांधींना खुश करण्यासाठी सपकाळांनी महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला – बावनकुळे
‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. दिल्लीतील नेत्यांना विशेषतः राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी सपकाळ यांनी हे अविवेकी आणि बेताल विधान करून महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा अपमान केला आहे.” अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.