Anjali Damania : अंजली दमानियांनी केले भाकीत- सप्टेंबरनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; शिंदेंचा भाव वाढणार, राज भाजपसोबत जातील
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काही मोठे दावे केले आहेत. सत्ताधारी एनडीएमध्ये सध्या सर्वकाही सुरळीत नसल्याचे दिसत असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावरही होईल, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. शिवाय सध्याच्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांचा भाव वाढेल परंतु सप्टेंबरनंतर काय होईल सांगता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.