Devendra Fadnavis : ब्राह्मण समाजाचे काम दुधात साखरे सारखे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्या इतकी पण ब्राह्मण समाजाचे काम दुधात साखरे सारखे असते. चिमूटभर साखर टाकली तरी गोडवा तयार करण्याचं काम होते. आपले ऐतिहासिक योगदान राहिले आहे, ते यापुढे राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.