Chandrashekhar Bawankule : ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंवर; म्हणाले- कुणाच्याही ताटातील दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही
मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर, ओबीसी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठा शेतकऱ्यांना कुणबी, म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला असून, जीआरची होळी करत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.