Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले, जातीनिहाय जनगणनेचा निर्णय फसवा; पहलगामवर म्हणाले- फ्री हँड दिला म्हणणे चुकीचे!
केंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय असून, तो जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसेच पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण सैन्याला प्रत्युत्तर द्यायला फ्री हँड दिला, असे पंतप्रधानांनी म्हणणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.