Pankaja Munde : पंकजा मुंडे म्हणाल्या- मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड, जोपर्यंत लोकांना गरज आहे तोपर्यंत काम करत राहणार
राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवान गडाला भेट दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.