Devendra Fadnavis : वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही; नीलेश चव्हाणच्या अटकेनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील नीलेश चव्हाण याला नेपाळच्या बॉर्डरवरून ताब्यात घेण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात जेवढे कोणी लोक असतील कोणालाही सोडले जाणार नाही.