मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारचा थेट सहभाग; मोठा पुरावा आला समोर!!
पुण्यातील कोरेगाव पार्क / मुंढव्याचा शासकीय भूखंड हा शितल तेजवानी हिच्या मार्फत लाटण्यासाठीच पार्थ अजित पवार यांनी अमेडिया कंपनीची स्थापना केली असावी, असा गंभीर आरोप माहिती विजय कुंभार यांनी केला. पण त्या पलीकडे जाऊन शितल तेजवानी हिने मुंढवा जमिनीची नजराना भरण्यासाठीचं पत्र दिल्यानंतरच अमेडिया कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर शितल तेजवानीच्या या पत्रावर पुढे कार्यवाही होत नाही म्हणून पार्थ अजित पवारने पुणे जिल्हा प्रशासनाला स्मरण पत्र दिल्याचे समोर आणले. हे पत्र विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दाखविले.