CM Fadnavis : औरंगजेबाच्या कबरीला काँग्रेसच्या काळात संरक्षण; हटवण्यासाठी घाईघाईने निर्णय घेता येणार नाही- CM फडणवीस
मोगल बादशहा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे. मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची ही कबर हटवण्यात यावी अशी मागणी होत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. औरंगजेबाच्या कबरीला काँग्रेसच्या काळात एएसआयचे संरक्षण मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. तसेच प्रत्येकाला असच वाटते की कबर हटवली पाहिजे. मात्र काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात, असेही ते म्हणाले.