Abu Azmi : अबू आझमी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात झाले हजर
औरंगजेबचे कौतुक केल्याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आज मुंबई पोलिसांसमोर हजर झाले. या प्रकरणात अबू आझमी यांना काल मुंबईतील सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला. मात्र त्यांना तीन दिवस तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागणार आहे.