Gopichand Padalkar पडळकरांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही; फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा सध्या संपूर्ण राज्यात तीव्र निषेध केला जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी उघड उघड नाराजी व्यक्त केली तर काहींनी यावर पडळकरांना खडे बोल देखील सुनावले.