Ajit Pawar NCP : अजितदादांना धक्का देत नागालँडमधील 7 आमदारांनी साथ सोडली; सत्ताधारी पक्षातल्या विलीनीकरणाला मान्यताही मिळाली!!
नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सर्व सात आमदार शनिवारी सत्ताधारी एनडीपीपीमध्ये सामील झाले. ज्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे.