आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाजपची स्पष्ट भूमिका
भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विजय चौधरी म्हणाले की, जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याने, भाजप नेहमीच स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार आहे.
भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विजय चौधरी म्हणाले की, जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याने, भाजप नेहमीच स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार आहे.
मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 13 जण रेल्वेमधून पडले. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या निधी वाटपावरून सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. . या योजनेसाठी इतर विभागांचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप मंत्र्यांसह विरोधकांनी केला असून , या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले असून, लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही विभागाचा निधी वळवलेला नाही, असा खुलासा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन’चा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील जागेसाठी प्रचंड आग्रह करत पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडी पणाला लावली होती. आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा विरोध असतानाही अट्टाहासाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र आता हेच चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे यांना रामराम ठोकत शिंदे गटात दाखल होणार असल्याची घोषणा झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज औंध, पुणे येथे पर्यावरणपूरक, सुपर ई.सी.बी.सी आणि नेट झिरो संकल्पनेवर आधारित नवनिर्मित ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)’च्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन झाले.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुका “मॅच फिक्सिंग” असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना मी नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीदेखील युतीबाबत मातोश्रीवर बैठक झाली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राजकारणात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संभाव्य युती, आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाजत आहे. मात्र या एकत्र येण्याने भारतीय जनता पक्षाला कुठलाही धोका नाही, असा ठाम विश्वास भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
देशात ज्यांची उरली नाही पत, ते व्यक्त करतायत आपले मत असे म्हणत राहुल गांधी यांचे विधान म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा मानसिकतेचे उदाहरण आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ठाकरे बंधू आणि पवार बहीण – भावांच्या ऐक्यासाठी माध्यमांनीच केली घायकुती; मुख्य नेते निवांत आणि इतरांच्याच लुडबूडी!! अशी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झाली आहे.
शिवसेना एकसंध न होण्यामागे “अदृश्य शक्तींचा हात असल्याचे सांगून “डॉक्टर” गजानन किर्तीकर यांनी शिवसेनेच्या राजकीय दुखण्याचे अचूक निदान केले
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊन 6 महिने उलटून गेल्यानंतर राहुल गांधींनी त्यावर मॅच फिक्सिंगचा लेख लिहिला. तो देशभरातल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये आज छापून आला.
ठाकरे बंधू एकत्र; पवार काका अस्वस्थ, शिंदे + अजितदादांना भाजपची सत्ता धरावी लागणार घट्ट!!, असे राजकीय समीकरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सूत्रधार झीशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवाल याला कॅनडातील सरे पोलिसांनी अटक केली आहे.
दबावाने किंवा लोभाने धर्मांतर घडवणे ही एक प्रकारची हिंसाच आहे. मात्र, जर एखाद्याने स्वेच्छेने धर्मांतर केले तर त्यास संघाचा विरोध नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
गंगा गोदावरी पुरोहित संघाचा वाद न्यायालयापर्यंत खेचण्याची खुमखुमी; विश्वास ठराव मंजूर होऊनही सोडवेना खुर्ची!! असला प्रकार नाशिक मध्ये घडला.
अजूनही “टाळी”, “पावले” आणि “फोन कॉल” या शब्दांपर्यंतच युतीची भाषा; पण ठाकरे बंधू अजूनही एकमेकांशी बोलेनात!!, अशी शिवसेना मनसे युतीची आजही अवस्था आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी नाशिकमध्ये बोलताना पक्षवाढीसाठी आपल्या पक्षाची कवाडे सर्वांसाठी खुली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजरांसाठी भाजपने अवघ्या 24 तासांतच आपले दरवाजे खुले केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 15 ऑगस्टला लागेल, असा अंदाजही बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्याच्या तिजोरीवर माझी लाडकी बहीण योजनेचा ताण पडत असल्याच्या बातम्या चर्चेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यभरातील 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या योजनांची मागील 3 वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे अंमलबजावणी होत नव्हती. परिणामी, सरकारने या योजनाच गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणे पर्यंतच्या 76 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन आज झाले आहे. यामुळे एका अर्थाने मागील वेळी मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण झाले आहे. यामुळे नागपूर ते मुंबई मधील अंतर कमी झाले असून वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते जोतिबा डोंगर (कोल्हापूर) येथे राष्ट्रीय महामार्ग, वनविभाग, जिल्हा प्रशासन व पश्चिम देवस्थान समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 10,000 वृक्षारोपण कार्यक्रम, ‘दख्खन केदारण्य’ची निर्मिती व श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाचा (ऑनलाईन) शुभारंभ पार पडला.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन समारंभातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच शक्तिपीठ महामार्ग देखील पूर्ण करू, असा निर्धार व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण झाले.
नाशिक मधल्या वादग्रस्त पुरोहित संघातली 38 वर्षांची मक्तेदारी अखेर संपली. सतत मनमानी कारभार चालविणाऱ्या सतीश शुक्ल यांची पुरोहित संघाने अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली.
राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) युतीच्या शक्यतेवर मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मौन सोडले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “दोन भावांनी म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांशी थेट संवाद साधावा. त्यांच्याकडे एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही”