मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता राज्यात ओबीसी समाजाचे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे आहेत. सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला असून, या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. नागपूरमध्ये झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत महामोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीला विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमधील ओबीसी नेते उपस्थित होते.