जातीनिहाय जनगणनेला मोदींनी मान्यता दिल्यामुळे सामाजिक न्यायाचे नवीन पर्व सुरू झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर हा निर्णय भविष्यात जातीव्यवस्था संपूर्णतः संपुष्टात आणण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून केंद्र सरकारचे आभार मानले आहे. यासोबतच या निर्णयावर काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची ‘सहन होत नाही, आणि सांगताही येत नाही’ अशी अवस्था होणार असल्याची टीका शिंदे यांनी केली.