दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनात “राजकीय काडी”; एकनाथ शिंदेंना शरद पवार घालणार शिंदेशाही पगडी!!
साहित्य संमेलनात राजकारण हा विषय नवीन नाही आणि त्याहीपेक्षा शरद पवार कुणाला तरी “टोपी” घालणार, हा देखील विषय नवीन नाही.
साहित्य संमेलनात राजकारण हा विषय नवीन नाही आणि त्याहीपेक्षा शरद पवार कुणाला तरी “टोपी” घालणार, हा देखील विषय नवीन नाही.
राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवान गडाला भेट दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हा संदेश इंडिया आघाडीला देखील दिला आहे. लोकसभेला आम्ही एकत्र लढलो, आघाडीतील प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ अशा सर्व राज्यात सर्वांनी एकमेकांना साथ दिली.
मुंबईत बऱ्याच दिवसांनी रंगल्या भेटीगाठी, झाले नाश्तापाणी तसेच दिल्लीत झाली डिनर डिप्लोमसी!! आजचा 10 फेब्रुवारी 2025 चा दिवस असा संमिश्र राजकीय घडामोडींचा ठरला.
अवैध वाळू उत्खनन, चोरटी वाहतूक, शासकीय कामात अडथळा, धमकीचे गुन्हा दाखल असलेल्या ९ जणांना चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्याची कारवाई अंबडचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह यांनी केली. त्यांना जालना, संभाजीनगर, बीड, परभणी जिल्ह्यांत प्रवेशास मनाई केली.
पंकजा मुंडे यांनी सोडून दिली स्वतंत्र पक्षाची पुडी; महाराष्ट्रातल्या राजकीय असंतुष्टांनी घेतली त्यामध्ये उडी!! असे चित्र महाराष्ट्रात दिसले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंशी ही पहिलीच भेट आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यावर जालना पोलिसांनी तडीपारची कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यात 9 वाळू माफियांविरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. यात मनोज जरांगे यांचा मेहुणा देखील आहे. विलास खेडकर असे त्याचे नाव आहे. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली होती. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये भारतातील देवदेवता आणि महापुरुषांची चित्रे होती. कालांतराने ती काढून टाकण्यात आली. आपल्या या दैवतांना घटनेत पुन्हा स्थान देण्यासाठी आवाज उठवण्याची गरज अाहे.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजां बाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण ठरतात, असे त्यांनी म्हटले आहे.
जनतेने नाकारलेल्या घराणेशाहीवरून एकमेकांची खेचाखेची राज ठाकरे आणि अजित पवारांच्या पक्षांच्या नेत्यांची रंगली जुगलबंदी!!
देवेंद्र फडणवीस सरकारने कायदेशीर कारवाई केली वाळू माफियांवर; पण मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली मनोज जरांगे यांनी आग पाखड केली देवेंद्र फडणवीसांवर!!
बीड जिल्हा आणि मराठवाड्यातले गुन्हेगारीचे बंड मोडण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्टिव्हेट झाले असून मनोज जरांगे यांचा सख्खा मेव्हणा वाळू माफिया विलास खेडकर याच्यासह नऊ जणांवर पोलिसांनी मराठवाड्यातून तडीपारचा बडगा उगारला आहे.
मुळशी तालुक्यात असलेल्या स्काय आय मानस लेक सिटीमध्ये पाकिस्तानी चलन सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही सोसायटी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) च्या कॅम्पसपासून काही मीटर अंतरावर आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
राहुल गांधी यांनी 2029 ची निवडणूक कामठी विधानसभेतून लढवावी, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असून चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला. पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. मागील 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला 22 जागांवर समाधान मानावे लागले. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील या यशामागे अमित शहा यांचे कष्ट आणि निवडणूक व्यवस्थापनाचेही मोठे योगदान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी या निवडणुकीतून आम्हाला खूप शिकायला मिळाले, असेही ते म्हणाले.
राज्यपालांच्या दौऱ्यात पुरोहित संघाने गोदावरी आरती पुन्हा ओढली वादात, इतकेच नाही तर राज्यपालांच्या भाषणात आणि त्यानंतर राष्ट्रगीतामध्ये देखील पुरोहित संघाने आपल्या आरतीचा आवाज वाढवून अडथळा आणला. हा सगळा प्रकार राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नाशिक दौऱ्यात घडला.
विशेष प्रतिनिधी नाशिक : देशातील नद्या या अध्यात्मिक प्रेरणा आणि सांस्कृतिक उत्थानाचे केंद्र आहेत. त्यांना प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. नाशिक […]
लवकर दिल्लीतील विभानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत त्यांचा पक्ष पराभूत होईल, हे त्यांना माहिती आहे. त्यासाठी आधीच नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.
महायुती सरकारच्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 5 लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी दिली
शक्तिपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत लोकांवरजबरदस्तीने लादला जाणार नाही. काही ठिकाणी विरोधअसेल तर शेतकरी व स्थानिकांसोबत चर्चा होईल.विरोध कायम राहिला, तर त्या भागातील अलायमेंटबदलले जाईल. मराठवाड्यातील जिल्ह्यांनाविकासाकडे नेणारा हा महामार्ग आहे. समृद्धीमहामार्गाच्या वेळीही असाच विरोध झाला होता.
आम्हाला ब्लॅकमेल केले जात आहे, त्रास दिला जातोय, वसुली केली जात आहे, अशा तक्रारी उद्योजकांकडून आमच्याकडे येत असतात. मात्र, हे खपवून घेतले जाणार नाही. उद्योगांना त्रास देणारा महायुतीचा किंवा इतर कोणत्याही पक्षाचा असूद्यात, त्याला सोडू नका. त्यांच्यावर थेट मकोका लावा. या लोकांवर मकोकाच्या खालची कारवाईच करू नका, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांना दिली.
समस्त नाशिककरांसाठी एक अनोखा सन्मान सोहळा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये रंगला.
औद्योगिक जमिनीचा वापर करावयाचा असल्यास त्यासाठी बिगरशेती (एनए) परवानगी आवश्यक असणार नाही. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे.