Eknath Shinde : एफबी म्हणजे ‘फुकटचा बाबूराव’; फेसबुक लाइव्ह करून फेक नरेटीव्ह पसरवले, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
एफबी म्हणजे फुकटचा बाबूराव, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला आहे. सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले, या प्रसंगी भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. तसेच मी पण एफबी म्हणजे ‘फेव्हरेट भाऊ’, असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.