Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- मोदी माझ्यापेक्षा चांगले नेगोशिएटर; भारताला F-35 फायटर जेट देण्यास अमेरिका तयार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री 3 वाजता व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. दोन्ही नेते सुमारे अडीच तास एकत्र राहिले. या काळात दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. ट्रम्प आणि मोदी यांनी दोनदा माध्यमांशी संवाद साधला.