Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पच्या धमकीपुढे झुकला पनामा, चीनला दिला दणका, वन बेल्ट वन रोड प्रकल्पातून माघार
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून जगभरात गोंधळ उडाला आहे. कॅनडा आणि मेक्सिकोसारख्या शेजारील देशांवर कठोर टॅरिफ लादून ट्रम्प यांनी खळबळ उडवून दिली आहे. चीनवरही 10 टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. पण ट्रम्प यांच्या प्रचंड दबावादरम्यान, पनामाने आता चीनला मोठा धक्का दिला आहे.