• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडासोबतच्या सर्व व्यापारी वाटाघाटी थांबवण्याचा निर्णय का घेतला?

    अमेरिकेने कॅनडासोबतच्या व्यापारी वाटाघाटी रद्द केल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. कॅनडाने अमेरिकेच्या प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांवर कर लादल्याच्या निषेधार्थ आम्ही कॅनडासोबतच्या व्यापारी वाटाघाटी रद्द करत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प म्हणाले की, एका आठवड्यात कॅनडाला त्यांच्या नवीन शुल्क दरांबद्दल माहिती मिळेल.

    Read more

    Trump Wins :जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या आदेशावर ट्रम्प यांचा कायदेशीर विजय; सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ कोर्टाचे अधिकार मर्यादित केले

    अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या बाजूने एक महत्त्वाचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश ट्रम्प यांच्या जन्म-आधारित नागरिकत्वाच्या आदेशावर देशभरात बंदी घालू शकत नाहीत.

    Read more

    China : चीनमध्ये 3 लष्करी अधिकारी बडतर्फ; यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या जवळच्या जनरल्सचाही सहभाग

    भ्रष्टाचारविरोधी कार्यक्रमाचा भाग म्हणून चीनने शुक्रवारी तीन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना काढून टाकले. यामध्ये जनरल मियाओ हुआ, नौदल प्रमुख व्हाइस अॅडमिरल ली हंजुन आणि चायना नॅशनल न्यूक्लियर कॉर्पोरेशनचे उपप्रमुख अभियंता लिऊ शिपेंग यांचा समावेश आहे.

    Read more

    Netanyahu’s : इराणी सुप्रीम लीडर खामेनींची हत्या करू इच्छित होता इस्रायल; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले- संधी मिळाली नाही

    इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी गुरुवारी सांगितले की, इस्रायल इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना संपवू इच्छित आहे. चॅनल १३ ला दिलेल्या मुलाखतीत काट्झ म्हणाले, “जर खामेनी आमच्या टप्प्यात असते तर आम्ही त्यांना मारले असते.”

    Read more

    Pakistans : ‘भारताच्या हवाई संरक्षणाबद्दल चीन गुप्त माहिती देत होता’, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची कबुली

    पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ख्वाजा आसिफ यांनी कबूल केले आहे की भारताबरोबरच्या युद्धादरम्यान पाकिस्तानला चीनकडून मदत मिळत होती. ख्वाजा म्हणाले की बीजिंग भारताबद्दलची माहिती इस्लामाबादला शेअर करते. युद्धादरम्यानही चीनने भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेशी संबंधित माहिती पाकिस्तानला शेअर केली.

    Read more

    Khamenei : खामेनी म्हणाले- अमेरिकेला इस्रायल संपण्याची भीती होती; म्हणूनच युद्धात उतरले

    इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी पुन्हा एकदा सांगितले की इराणने इस्रायलविरुद्धचे युद्ध जिंकले आहे. त्यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘खोटे बोलणाऱ्या इस्रायली सरकारवर विजय मिळवल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. इराणने आपल्या हल्ल्यांनी इस्रायलचा नाश केला आहे आणि तो चिरडला आहे.’

    Read more

    Xi Jinping : ब्राझीलमधील ब्रिक्स परिषदेला जिनपिंग जाणार नाहीत; PM मोदींना स्टेट डिनरच्या आमंत्रणाने चिनी राष्ट्रपती नाराज

    चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पुढील आठवड्यात ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकाचा हवाला देत चीनने ब्राझीलला याची माहिती दिली आहे, असे वृत्त साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) ने दिले आहे.

    Read more

    Indians Iran Evacuation Halted : इराणमधून भारतीयांचे स्थलांतर थांबले; इस्रायल- इराण युद्धबंदीनंतर निर्णय; दूतावासाची परिस्थितीवर नजर

    इराण आणि इस्रायलमधील लष्करी संघर्षादरम्यान सुरू झालेले स्थलांतर थांबवण्यात येत असल्याचे मंगळवारी इराणमधील भारतीय दूतावासाने सांगितले, कारण दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली आहे. स्थलांतरासाठी नवीन नावे नोंदणी करण्यासाठी उघडलेले डेस्क दूतावासाने बंद केले आहे.

    Read more

    NATO Summit : नाटो शिखर परिषदेत ट्रम्प यांच्या अजेंड्याला विरोध; स्पेनचा संरक्षण खर्च वाढवण्यास नकार

    बुधवारी नेदरलँड्समधील हेग येथे उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) शिखर परिषदेचा दुसरा दिवस होता. येथे सदस्य देशांचे प्रमुख भेटले. ही बैठक नाटोच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या बैठकांपैकी एक मानली जात आहे. हे अशा वेळी होत आहे जेव्हा मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल युद्धाच्या १२ दिवसांनंतर युद्धबंदी झाली आहे.

    Read more

    Netanyahu :नेतान्याहूंचा खुलासा- ट्रम्प यांनी फेब्रुवारीतच हल्ल्याचा प्लॅन सांगितला; साथ देण्याचा निर्णय त्यांचा होता

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी सांगितले की त्यांनी फेब्रुवारीमध्ये व्हाईट हाऊसच्या भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर हल्ला करण्याच्या योजनेबद्दल सांगितले होते.

    Read more

    Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे घेतले श्रेय

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे.

    Read more

    इराण आणि इजराइलने शस्त्रसंधी तोडल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना दिल्या शिव्या

    इराणने कतार मधल्या अमेरिकी हवाई तळांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणला प्रतिहल्ला करून उत्तर दिले नाही. इराणने “बदला” घेतला.

    Read more

    ..अखेर इराण अन् इस्रायलमध्ये युद्धबंदी!, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी एका एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, इस्रायल आणि इराण त्यांचे अंतिम अभियान पूर्ण करतील तेव्हापासून सुमारे ६ तासांनी ही युद्धबंदी लागू होईल.

    Read more

    Iran attack कतारमधील अमेरिकन एअरबेसवर इराणच्या हल्ल्यानंतर भारतीय दूतावास अलर्ट मोडवर!

    इराणने अमेरिकेविरुद्ध मोठी प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे. इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकन एअरबेसवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यानंतर, भारतीय दूतावासाने कतारमधील भारतीय लोकांसाठी एक अडव्हाझरी जारी केली आहे.

    Read more

    Israel Iran War : कसली युद्धबंदी आणि कसलं काय?, युद्धबंदीनंतरही इराणचा इजराइल वर हल्ला; “बदला” घेतल्यावर तरी इराण शांततेकडे वळेल; ट्रम्पनी केले होते ट्विट!!

    मेरिकेने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर अचूक हल्ले केले. पण इराणने कतार मधल्या अमेरिकन हवाई तळांवर हल्ले करून “बदला” घेतला.

    Read more

    Hormuz immediately : हॉर्मूझ सामुद्रधुनी’ तात्काळ बंद करण्याचा इराणच्या संसदेचा निर्णय, जागतिक ऊर्जा संकटाची भीती, युद्ध अधिकच तीव्र होणार

    इराण-इस्रायल युद्ध अधिकच भडकत असताना, इराणच्या संसदेनं घेतलेल्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या अणुकेंद्रांवरील हल्ल्याला प्रत्युत्तर देत इराणने ‘हॉर्मूझ सामुद्रधुनी’ तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असून, यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

    Read more

    Pakistan Anger : ‘शहबाज-मुनीर यांनी त्यांच्या मालकाला खुश करण्यासाठी देश विकला’, ट्रम्प यांच्या नोबेलच्या शिफारशीवर पाकिस्तानी जनता संतापली

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी केल्याबद्दल पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या सैन्यावर सोशल मीडियावर तीव्र टीका होत आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी नॉर्वे येथील नोबेल शांतता पुरस्कार समितीला औपचारिकपणे पत्र पाठवले आहे, ज्यामध्ये अलिकडच्या भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान ‘निर्णायक राजनैतिक हस्तक्षेप’ केल्याबद्दल अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्काराची शिफारस करण्यात आली आहे.

    Read more

    सिंधू जल करारात इस्लामी देशांची संघटना OIC ची लुडबुड, पाकिस्तानच्या बाजूने केली खुडबुड, भारताचा घेतला वेगळ्याच कारणासाठी “बदला”!!

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात भारताने आपला वैध अधिकार वापरून सिंधू जल करार स्थगित केला. त्यामुळे पाकिस्तानला भीषण जलटंचाईला सामोरे जावे लागले. तरी देखील पाकिस्तानने आपली राजकीय मस्ती सोडली नाही.

    Read more

    Irans : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर समोर आली इराणची पहिली प्रतिक्रिया

    अमेरिकेने शनिवारी इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील तीन प्रमुख अणु केंद्रांवर बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यानंतर, इराणच्या अणुऊर्जा संघटनेने (एईओआय) रविवारी पहिले अधिकृत निवेदन जारी केले. एईओआयने म्हटले आहे की आमची सर्व अणु केंद्रे सुरक्षित आहेत. रेडिएशन लीक झालेले नाही आणि तपासात कोणतेही नुकसान झाल्याचे दिसून आले नाही.

    Read more

    Air balloon : Video – आकाशात पेट घेतलेल्या हॉट एअर बलूनचा थरार! आठ जणांचा मृत्यू, १३ जण जखमी

    ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यात उडणाऱ्या एका हॉट एअर बलुनला आग लागली. त्यानंतर, तो बलुन थेट आकाशातून खाली पडला. ज्यात आठ जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही दुर्घटना शनिवारी घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यासंबंधीचे फुटेज प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये आग लागलेल्या हॉट एअर बलूनमधून धूर निघताना दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अपघातातून १३ जण वाचले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Read more

    दहशतवादी देशाच्या शिफारशीवर, ट्रम्पचा डोळा नोबेलवर; पण “पाकिस्तानी कबूतर” शिटले शस्त्रसंधीच्या credit वर!!

    दहशतवादी देशाच्या शिफारशीवर, ट्रम्पचा दावा नोबेलवर!!, असे अमेरिकेच्याही इतिहासातले रसातळाचे राजकारण आज घडले. अमेरिकेनेच शस्त्रास्त्रे देऊन पोसलेलेल्या पाकिस्तान सारख्या मंडलिक राष्ट्राने अमेरिकेच्या अध्यक्षाला नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस पत्र दिले. आणि ते मिळवणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

    Read more

    Israel : इस्रायलने इराणच्या “इस्फहान अणुऊर्जा केंद्रावर” केला मोठा हल्ला

    इस्रायलने इराणच्या इस्फहान अणुऊर्जा केंद्र आणि क्षेपणास्त्र ठिकाणावर मोठा हल्ला केला आहे. यासोबतच, इस्रायली सुरक्षा दलांनी (आयडीएफ) इराणी रिवोल्यूशनरी गार्ड्सचे (आयआरजीसी) कुद्स फोर्समधील पॅलेस्टिनी विभागाचे प्रमुख सईद इजादी यांनाही ठार केलं आहे.

    Read more

    एकीकडे पाकिस्तानचे अनेक तुकडे स्वतंत्र व्हायच्या बेतात; दुसरीकडे सत्ताधारी मंत्र्यांचीच निदान वेगळी राज्ये करायची मागणी!!

    आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या रगड्यात आपल्या देशाचे तुकडे होतील, याची खात्री दहशतवादी देश पाकिस्तानला पटत चालली आहे

    Read more

    Pakistan Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीरकडून भारताने उद्ध्वस्त केलेल्या अतिरेकी तळांची दुरुस्ती; 40 कोटींचा निधी जारी

    ७ मे रोजी रात्री ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने अचूक स्ट्राईक करून पाकिस्तान आणि पीओकेमधील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे अड्डे समाविष्ट होते. पण आता, पाकिस्तानी सैन्य ते पुन्हा दुरुस्त करत आहे.

    Read more

    Israel’s Economy : युद्धामुळे इस्रायल आर्थिक संकटात; दररोज 6000 कोटींचा खर्च; जीडीपी वाढीचा दर 3.6% पर्यंत घसरला

    इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेला संघर्ष हा केवळ लष्करी संघर्ष नाही तर तो आता आर्थिक संकटातही रूपांतरित होत आहे. इस्रायलचे माजी संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) रामेम अमिनच यांच्या मते, युद्ध लढण्यासाठी इस्रायल दररोज ७२५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६,००० कोटी रुपये) खर्च करत आहे.

    Read more