Elon Musk : ‘मी नसतो तर ट्रम्प निवडणूक जिंकले नसते’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क रिपब्लिकन कर विधेयकावरून समोरासमोर आले आहेत. त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येते. डोनाल्ड ट्रम्प यांनी कर विधेयकावर नाराजी व्यक्त केली तेव्हा मस्क यांनी असे उत्तर दिले, की जर ते नसते तर डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकले नसते.