China : चीन आजपासून अमेरिकन वस्तूंवर 15% कर लावणार; टॅरिफ युद्धामुळे चीनला अमेरिकेपेक्षा अडीच पट जास्त नुकसान, भारतालाही फटका
चीनने अमेरिकन उत्पादनांवर लादलेला कर आजपासून म्हणजेच सोमवारपासून लागू होईल. अमेरिकेने लादलेल्या २०% अतिरिक्त शुल्काच्या प्रत्युत्तरात चीनने हा शुल्क लादला आहे. वास्तविक, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ फेब्रुवारी रोजी चीनवर १०% अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला होता. एका महिन्यानंतर, ट्रम्प यांनी चीनवर लादलेले १०% कर २०% पर्यंत वाढवले.