Mark Carney : मार्क कार्नी कॅनडाचे पुढचे पंतप्रधान, म्हणाले- कॅनडा कोणत्याही प्रकारे अमेरिकेचा भाग होणार नाही
मार्क कार्नी हे कॅनडाचे पुढचे पंतप्रधान असतील. ते जस्टिन ट्रुडो यांची जागा घेतील. रविवारी रात्री उशिरा लिबरल पक्षाने त्यांची नेतेपदी निवड केली. कार्नी यांना ८५.९% मते मिळाली. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कार्नी यांनी माजी अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड, माजी सरकारी सभागृह नेत्या करीना गोल्ड आणि माजी संसद सदस्य फ्रँक बेलिस यांचा पराभव केला.