ऐक्याची वातावरण निर्मिती चांगली, पण ठाकरे बंधूंच्या पुढे पहिले आव्हान शिवसेना + मनसेतली गळती रोखायचे!!
मराठीचा मुद्दा उचलून ठाकरे बंधू एकत्र येण्याची वातावरण निर्मिती तर चांगली झाली. ठाकरे बंधू या मेळाव्यात युतीची घोषणा करणार की नाही याविषयी देखील चर्चा झाली. पण काही झाले तरी युती होणे किंवा न होणे हा भविष्यातला थोडा दीर्घकालीन भाग झाला. त्याआधी ठाकरे बंधूंच्या पुढे पहिले आव्हान आहे, ते शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमधली गळती रोखायचे!!