Thursday, 1 May 2025
  • Download App
    परग्रहावर जीवसृष्टी असेल का?। Will there be life on the planet?

    परग्रहावर जीवसृष्टी असेल का?

    शनीचा उपग्रह टायटनवर जीवसृष्टी असण्याची शक्यता वारंवार वर्तविण्यात येते. परंतु, या ग्रहाची स्थिती ध्यानात घेतली तर तेथील जीवांची कल्पना करणेही खूप कठीण आहे. टायटन ग्रहाच्या वातावरणात ९८ टक्के नायट्रोजन आहे. तिथे मिथेनच्या नद्या आणि समुद्र आढळतो. या ठिकाणी १७५ ते १८० उणे तापमान असते. अशा परिस्थितीत तिथे जीवन अस्तित्वात आले असेल तर हे जीव सूर्यप्रकाशाचा सामना करू शकणार नाहीत आणि त्यांनी महत्प्रयासाने एखादे यान पृथ्वीवर पाठवले तर ते उद्दिष्ट साधण्याआधीच वितळून नष्ट होऊन जाईल. उडत्या तबकड्या हा एक गोंधळात टाकणारा शब्द आहे. Will there be life on the planet?

    आजपर्यंत अनेकांनी उडत्या तबकड्या पाहिल्याचे दावे केले आहेत. परंतु, ही बाब सिद्ध होऊ शकलेली नाही. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी उडत्या तबकड्या म्हणजे विज्ञान युगातील अंधश्रद्धा असल्याचे म्हटले आहे. २४ जून १९४७ रोजी केनेथ अरनॉल्ड यांनी तब्बल नऊ तबकड्या आकाशात उडताना पाहिल्याचा दावा केला आणि संपूर्ण जगात खळबळ उडाली. त्यानंतर अनेकांनी तबकड्या पाहिल्याचे दावे केले. विशेष म्हणजे या तबकड्या काही क्षणातच नाहीशा होत असल्याचेही सांगण्यात येते. भारतातही असे प्रकार घडले आहेत. या प्रकारात सत्यता असेल तर या तबकड्या आपल्या आसपास राहणाऱ्या परग्रहवासी जीवांच्याच असतील, असाही एक मतप्रवाह आहे. कारण, लाखो- करोडो प्रकाश वर्षे प्रवास करून पृथ्वीवर पोहोचणे शक्यच नाही. परग्रहवासी शंभर टक्के अस्तित्वात आहेत.

    परंतु, आपण त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. त्यामुळे फक्त कल्पना करणे एवढेच आपल्या हाती आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी परग्रहवासी जीवांच्या अस्तित्वाची शंभर टक्के खात्री व्यक्त केली होती. आपण अद्याप आपल्या सौरमंडळाचा प्रवास करण्यासही सक्षम नाही आहोत. अशा परिस्थितीत परग्रहवासी जीवांचा शोध कसा लागणार? त्यामुळे अजून तरी परग्रहावर अन्य कोणी राहते यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पण विज्ञान कधीच कोणती शक्यता पूर्ण नाकारत नाही. कारण आत्ता यासाठी जरी पुरावा मिळत नसला तरी भविष्यात मिळणारच नाही असातला भाग नाही. कारण विज्ञान शक्यतेची सारी कवाडे नेहमी उघडी ठेवते.

    Will there be life on the planet?

    Related posts

    Caste census : काँग्रेसने राहुलच्या यशाचे ढोल पिटले तरी प्रत्यक्षात मोदींचे “कमंडल” राजकारण यशस्वी, “मंडल” राजकारणात एन्ट्री!!

    मोदी तिकडे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायच्या बेतात; पवार इकडे दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलात!!

    RSS chief Mohan Bhagwat प्रचंड राजकीय धकाधकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मोदींच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा, पण नेमके गूढ काय??

    Icon News Hub