Wednesday, 30 April 2025
  • Download App
    का येतो घामाचा दुर्गंध? Why the stench of sweat?

    विज्ञानाची गुपिते : का येतो घामाचा दुर्गंध?

    घामाचा त्रास सर्वानाच होतो. घामाची दुर्गंधी नकोशी होते. घामाला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत. घामामध्ये हवेतील जिवाणू मिसळल्यानेही दुर्गंध निर्माण होतो. परंतु, आपल्या शरीरातील घामाचा दुर्गंध हा फिश ओडर सिंड्रोमचे लक्षण असू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. Why the stench of sweat?

    विशिष्ट प्रकारच्या जनुकातील बदलांमुळे हा परिणाम झालेला असतो. वैद्यकीय भाषेत सांगायचे झाले तर याला ट्रायमिथाइलअमिनुरिया असे म्हटले जाते. ट्रायमिथाइलअमाइन अधिक प्रमाणात स्रवल्यामुळे हा परिणाम दिसून येतो. कोलाइनची मात्रा अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे टीएमए तयार होतो. सोया, राजमा, अंडी यामध्ये कोलाइनचे प्रमाण चांगले असते.

    शारीरिक स्वच्छता ठेवल्यानंतरही काही जणांच्या चयापचयाच्या प्रक्रियेतील बिघाडामुळे आणि टीएमएमुळे घामाला दुर्गंध येतो असे संशोधकांचे मत आहे. फिलाडेल्फियातील शास्त्रज्ञांनी याबाबतचे संशोधन केले आहे. ट्रायमिथाइलअमिनुरिया अर्थात टीएमएचा उपचार विशिष्ट चाचणीशिवाय शक्य नाही. एफएमओ ३ या जनुकामध्ये बिघाड झाल्याने ट्रायमिथाइलअमिनुरिया होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. टीएमएला स्वतःचा असा तीव्र गंध असतो. परंतु, ट्रायमिथाइल अमिनुरियाचा त्रास असलेल्यांपैकी केवळ १० ते १५ टक्के लोकांच्या घामाला तीव्र दुर्गंध येतो.

    जनुकातील बदल किंबा बिघाड हा आई-वडिलांकडून मुलांकडे येऊ शकतो. इक्वेडोर आणि न्यू गिनीमधील लोकांमध्ये एफएमओ ३ ही जनुकांतील बदल मोठ्याप्रमाणात असल्याचे संशोधकांना आढळले. ब्रिटिश श्वेतवर्णियांपैकी एक टक्के लोकांमध्येही हा बदल दिसून आल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जगभरातील बऱ्याच मोठ्या लोकसंख्येमध्ये हे बदल असू शकतात.

    ट्रायमिथाइलअमिनुरियाचा त्रास आहे का नाही हे तपासण्याचे काम अमेरिकेतील काहीच प्रयोगशाळांमध्ये होते. परंतु, आपल्या शरीराला किंवा घामाला दुर्गंध येऊ नये यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे गरजेचे आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. कोलाइन हे पेशींची वाढ, चयापचय क्रिया आदींसाठी गरजेचे असते. आपल्या यकृतातही ते काही प्रमाणात तयार केले जाते. परंतु, खाद्यपदार्थांतून ते सर्वाधिक प्रमाणात शरीरात येते. याचे प्रमाण बिघडले की दुष्परिणाम दिसून येतात.

    Why the stench of sweat?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मोदी तिकडे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायच्या बेतात; पवार इकडे दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलात!!

    RSS chief Mohan Bhagwat प्रचंड राजकीय धकाधकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मोदींच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा, पण नेमके गूढ काय??

    PM Modi : पाकिस्तानात घुसून मारताना भारतीय सैन्य दलांमध्ये आता राजकीय हस्तक्षेप नाही, पण तो केव्हा आणि कुणी केला होता??