• Download App
    ठाकरे परिवार आपणच घडविलेल्या नेत्यांशी राजकीय नुरा कुस्ती का खेळू शकत नाही?? | The Focus India

    ठाकरे परिवार आपणच घडविलेल्या नेत्यांशी राजकीय नुरा कुस्ती का खेळू शकत नाही??

    देशात लोकसभा निवडणुका साधारणपणे आठ महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना ढोबळमानाने दोन राजकीय आघाड्या एकमेकांसमोर उभ्या ठाकताना दिसत आहेत. पण यातल्या मोदी विरोधी “इंडिया” आघाडीत खूप मोठी राजकीय विसंगती उघड्यावर येताना दिसत आहे. बंगलोर मध्ये झालेली 26 पक्षांची “इंडिया” आघाडी आता 23 – 24 पक्षांची तरी उरते आहे का??, की ती आणखी घटते??, असे वाटण्यासारखी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. Why thackeray family unable to nuuraa-kushtii against their own people opponents??

    “इंडिया” आघाडीतले घटक पक्ष केंद्रात मोदी विरोधात, पण आपापल्या राज्यांमध्ये काँग्रेसशी राजकीय नुरा कुस्ती खेळण्याची शक्यता आहे. दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड येथे ती परिस्थिती उद्भवलीच आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्या या राज्यांमध्ये राजकीय नुरा कुस्ती सुरू झाली आहे.

    पण त्या पलीकडे जाऊन पक्षाची दोन शकले झालेले नेते देखील नुरा कुस्तीत दंग असल्याचे चित्र दिसते. एकाच वेळी दोन डगरींवर हात ठेवून पाय ठेवून राजकारण साध्य करून घ्यायचे, सत्ताकरणाच्याच्या दिशेने जायचे याला विशिष्ट राजकीय कौशल्य लागते. ते अनेकांनी आत्मसात केले आहे. पण मग महाराष्ट्राच्या राजकारणात तीन पिढ्या मुरलेले एक प्रमुख राजकीय कुटुंब ठाकरे परिवार या राजकीय कौशल्यात कुठे आणि का कमी पडतो??, त्याला अशी राजकीय नुरा कुस्ती का खेळता येत नाही??, हे सवाल महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने कळीचे ठरत आहेत.



    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी घडविलेले शिवसैनिक काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांशेजारी आणि विरोधी पक्षनेता शिवसेनेचा असे चित्र नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्या रूपाने अनेक वर्षे दिसले. बाळासाहेब ठाकरेंचे पठ्ठे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत शिवसेनेतून पोहोचले, पण उपमुख्यमंत्री पदापर्यंत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतूनही पोहोचले. हे चित्र बाळासाहेबांचा फार मोठा राजकीय प्रभाव दर्शविणारे आहे. महाराष्ट्रात इतर कोणालाही ते जमले नाही. पण आपल्या पठ्ठ्यांना इतर पक्षांमध्ये जाऊन सत्ता का मिळवावी लागते??, याचा विचार बाळासाहेबांनी केला नाही. तसाच तो त्यांच्या पुढच्या पिढीतल्या उद्धव ठाकरेंनीही केलेला नाही हेच दिसून येते. आदित्य ठाकरेंनी हा विचार करण्याचे त्यांचे वयच नाही.

    पण आपण खपून जी संघटना उभी करतो, महाराष्ट्रव्यापी बांधतो, त्यातले नेते, उपनेते आणि शिवसैनिक इतरत्र जाऊन सत्ता मिळवतात, मग आपणच त्यांना ती सत्ता का मिळवून देऊ शकत नाही??, याचा विचार ठाकरे परिवारातील दुसऱ्या पिढीतल्या प्रमुखांना देखील करता येत नाही का??, हा प्रश्न आहे.

    इतकेच नाही, तर त्या पलीकडे जाऊन असे नेमके काय घडते??, की ठाकरे कुटुंबाला आपल्याच नेत्यांना आणि शिवसैनिकांना आपल्याशी घट्ट बांधून ठेवता येत नाही आणि बांधून ठेवता आले नाही, तर किमान ते बाहेर गेले तरी त्यांच्याशी सौहार्द पूर्ण संबंध ठेवता येत नाही??, हा खरंच गंभीर वाटावा असा प्रश्न आहे.

    याच्या अनेक संभाव्य उत्तरांपैकी एक उत्तर राज ठाकरेंनी आज पिंपरीत दिले. त्यांनी, आमच्यावर वार झाला की आम्ही पलटवार करतो, हा ठाकरेंचा dna आहे, असे म्हटले. याचा अर्थ “घात तिथे प्रत्याघात” हा सर्वसामान्य नियम ठाकरे कुटुंबीय पाळते. पण हा नियम राजकारणात सर्वत्र लागू होतोच, असे नाही. उलट “घात झाला म्हणून प्रतिघात” केलाच पाहिजे, असे नाही, तर त्या ऐवजी एक व्यापक भूमिका घेऊन वडीलकीच्या नात्याने अनेक गोष्टी साध्य करता येऊ शकतात, हे ठाकरे कुटुंबीयांच्या लक्षात येत नाही की ते लक्षात घेत नाहीथ??, हाही प्रश्न आहे.

    अन्यथा महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे हे एकमेव कुटुंब असे आहे, ज्या कुटुंबाने घडविलेले नेते, उपनेते आणि शिवसेनेत अन्य पक्षांमध्ये विशिष्ट दबदबा राखून आहेत. त्यांच्याशी ठाकरे परिवाराने कुटुंबाने जुळवून घेतले, राजकीय वैर विशिष्ट मर्यादेपर्यंत ठेऊन त्यांच्याशी राजकीय नुरा कुस्ती खेळली, तरीदेखील महाराष्ट्रात बाळासाहेबांना अपेक्षित असलेली शिवसेनेची पूर्ण सत्ता येऊ शकते. जी तामिळनाडू, आंध्र, तेलंगण यांच्यासारख्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची आली आणि टिकली!! पण ठाकरे कुटुंब राजकीय नुरा कुस्ती कमी पडते, हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने फार मोठा अयब आहे. तो दूर कसा आणि केव्हा होईल??, हे आत्ता तरी सांगता येत नाही!!

    Why thackeray family unable to nuuraa-kushtii against their own people opponents??

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस