जगभरात व्याजदरांमध्ये सतत वाढ होत आहे. डॉलर मजबूत झाल्याचा थेट परिणाम जनसामान्यांचे सर्वात आवडते गुंतवणुकीचे साधन सोन्यावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 15 महिने आणि देशांतर्गत बाजारात 5 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे.The Focus Explainer Why Gold Hits 5-Month Low? Currently below 50 thousand, likely to go up to 48 thousand soon
एक्स्पर्टच सांगतात की, ही घसरण आणखी काही दिवसू टिकू शकते. पुढील 3 ते 6 महिन्यांत सोने प्रति 10 ग्रॅम 48 हजार रुपयांवर येऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोने गेल्या एका महिन्यात 143 डॉलर (7.8 %) घसरून 1700 डॉलर प्रति औंसापर्यंत खाली आले.
देशांतर्गत बाजारावरही याचा परिणाम पाहायला मिळाला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, सराफ्यामध्ये सोने 49,970 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. यापूर्वी सोने याच वर्षी फेब्रुवारीमध्ये 50 हजारांच्या खाली आले होते. सुमारे 23 महिन्यांआधी 7 ऑगस्ट 2020ला सोने 56, 126च्या विक्रमी पातळीवर होते.
सोन्याच्या किमती घसरण्याची कारणे कोणती
अमेरिकेत मार्चपासून आतापर्यंत व्याजदरात 1.5% वाढ, 27 जुलै रोजी पुन्हा एकदा 0.75% वाढीची शक्यता.
21 जुलै रोजी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत युरोपियन सेंट्रल बँक 11 वर्षांत प्रथमच दर वाढवेल अशी दाट भीती आहे. महागाईमुळे बऱ्याच विकसित देशांत सोन्याची मागणी घटली आणि चीनमध्येही मागणी कमी होण्याचे संकेत आहेत. युरोपीय संघाच्या 27 देशांनी रशियावरून सोन्याच्या आयातीवर बंदी लावली आहे. त्यामुळे इतर देशांमध्ये त्याचा पुरवठा वाढला.
भाव वाढण्याची शक्यता कमी
तज्ज्ञांच्या मते, डॉलर आणखी मजबूत होण्याची शक्यता. आहे. यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारात पुढच्या तीन महिन्यांपर्यंत ही घसरण राहू शकते.
40 हजारांवर आले असते सोने
रुपयाची घसरण आणि आयात शुल्क वाढल्याने सोन्याला अतिरिक्त आधार मिळत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे विनिमय दर जर एका वर्षापूर्वीच्या पातळीवर असते तर देशात सोन्याची किंमत 40,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षाही खाली असती. 21 जुलै 2021 ला रुपया 74.52/डॉलर होता.