• Download App
    मुलांना सर्वाधिक भिती कशाची What worries children the most

    विज्ञानाची डेस्टिनेशन्स : मुलांना सर्वाधिक भिती कशाची

    अमेरिकेत बालवाडीत जाणाऱ्या बहुतेक मुलांना डॉक्टेरांची भीती वाटते. बालरोगतज्ञांची भेट ही पालकांच्या दृष्टीनेही चिंतेची बाब असते. दोन ते पाच वर्षेवयोगटातील एकूण मुलांपैकी निम्म्याहून जास्त मुलांना डॉक्ट रांची भीती वाटते, असे एका पाहणीतून दिसले आहे. What worries children the most

    मिशिगन विद्यापीठाने केलेल्या संशोधनात हजारो पालकांची मुलाखत घेण्यात आली. त्यात पाचपैकी एका पालकाने आपल्या मुला ला डॉक्टोरची भीती वाटत असल्याचे सांगितले. यामुळे लसीकरण किंवा डॉक्टारच्या भेटीची वेळही पुढे ढकलावी लागली आहे. काही मुले दवाखान्यात गेले की एवढा गोंधळ घालतात की डॉक्टुर किंवा परिचारिका काय बोलतात, हे ऐकूच येत नाही, असा अनुभवही काहींनी सांगितला.

    मुलांना दवाखान्यात जाणे आवडत नाही, याचे एक कारण म्हणजे इंजेक्शुनची भीती. ती घालविण्यासाठी पालकांनी मुलांना कवटाळणे, एखादे गाणे, चित्राकडे त्यांचे लक्ष वेधणे, इंजेक्शनन दुखणार नाही, असे सतत सांगणे, असे काही उपाय सुचवण्यात आले आहेत. तसेच बालरोगतज्ञांनाही मुलांशी कसा खेळकरपणे संवाद साधायचा, त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी नेमके काय करायचे याचे खास प्रशिक्षण देण्याची गरज या नव्या संशोधन पाहणीत नमूद करण्यात आली आहे.

    हे संशोधन जरी भारतातील नसले तरी मुलांची मानसिकता ही जगभर बहुतांश प्रकारे सारखीच असते. त्यामुळे जगभरातील मुलांना या संशोधनातील निष्कर्ष कमी अधिक प्रमाणात लागू पडतात.

    अर्थात मुलांना दवाखान्यात नेले जाते ते त्यांच्या हितासाठीच. मात्र हे कळण्याचे त्यांचे वय नसते. अर्थात मुलांच्या मनात हीभिती बसण्यात अनेकदा पालकांचाही मोठा वाटा असतो. कारण अनेकदा पालक मुलांना दंगा घातला की इंजेक्शन देईन असी बिती घालतात. याचाही बालमनावर विपरित परिणाम होत असतो हे लक्षात घ्यायला हवे. मुले ऐकत नसतील तर त्यांना योग्य प्रकारे समजावून सांगणे हिताचे असते.

    What worries children the most

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!