• Download App
    कशातून येतो आपळ्या व्यक्तीमत्वाला खरा आकार What is the true shape of your personality?

    लाईफ स्किल्स : कशातून येतो आपळ्या व्यक्तीमत्वाला खरा आकार

    एकेकाळी, अगदी आता सुद्धा देशाच्या काही भागांमध्ये २००, ३०० लोक एकत्र राहायचे एका मोठ्या घरात. कारण नवरा, बायको, मुले, आजोबा, आजी, काका, काकू, चुलत आजोबा, चुलत आजी, चुलत भावंडे, सर्वजण एकच परिवार म्हणून नांदायचे.What is the true shape of your personality?

    आपण सुशिक्षित होत गेलो, आपण काका, काकू, चुलत भावंडांना काढून टाकलं आणि फक्त नवरा, बायको, मुले आणि आई-वडील फक्त यांनाच आपले कुटुंब मानू लागलो. काही काळानंतर आपण आपल्या पालकांना सुद्धा काढून टाकले. आपल्याला वाटू लागले, की नवरा बायको आणि मुले म्हणजेच कुटुंब, आता मुलं असं विचार करू लागली आहेत, की ते तसंही नाही.

    आता परिस्थिती अशी बनली आहे, की नवरा-बायको सुद्धा एकत्र राहू शकत नाहीत. कधीतरी थोड्यावेळासाठी भेटल्यास ते छान असतात. फक्त विकेंड विवाहित आयुष्य त्यांना चालतं, पण आठवड्याचे इतर दिवस एकत्र राहणं अशक्य होतं. हे असं घडतंय, कारण तुम्ही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्याऐवजी खूपच स्वकेंद्रीत होत आहात. मात्र यातून तुमच व्यक्तीमत्व अयोग्य प्रकारे घडते.

    आजचा आधुनिक समाज स्वकेंद्रीत होण्यास प्रोत्साहित करत आहे. पूर्वी कधीही माणसाने एवढ्या सुखसोई आणि सुविधा अनुभवल्या नव्हत्या. पूर्वी कधीही माणसांनी अशा प्रकारचं अन्न आणि आरोग्य उपभोगलं नव्हतं. असं असूनही पूर्वी कधीही लोक आजच्या लोकांप्रमाणं निराश आणि तणावग्रस्त जीवन जगले नव्हते. कारण आज लोक एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत, ते खूपच स्वकेंद्रीत बनले आहेत.

    सर्वसमावेशक असाल तरच नातेसंबंध जोडू शकता, स्वकेंद्रितपणा स्वाभाविकपणे नैराश्यात ढकलतो. योग म्हणजे परमोच्च सर्वसमावेशकता, योग शब्दाचा शब्दश: अर्थ आहे ऐक्य. तुम्ही सृष्टीतील, एकूण एक सर्वांशी ऐक्य साधता, हाच योग आहे. योग म्हणजे फक्त तुमचे शरीर वेडेवाकडे पिळणे नव्हे किंवा पायांची गाठ मारून बसणे नव्हे. योग म्हणजे तुमच्या अनुभवात एकूणएक गोष्टींशी तुम्ही एक झाला आहात.

    आता सर्वकाही कसे काय एक होऊ शकते? तुम्ही हे तुम्ही आहात, मी हा मी आहे, नाही का? तर हे दोन्ही एक होण्याचा प्रश्न येतोच कुठं? अशातूनच खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्वाला आकार येतो.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!