• Download App
    ग्राफिन म्हणजे नेमके काय?। What is graffin

    ग्राफिन म्हणजे नेमके काय?

    विविध प्रकारच्या बांधकाम साहित्यामुळे सर्वाधिक प्रदूषण होते. त्याचबरोबर प्लॅस्टिकचा राक्षस वाढत आहे. हे प्रदूषण कमी करण्याचा आणि पर्यावरणपूरक साहित्य तयार करण्याचा एक मार्ग शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. तो मार्ग आहे कचऱ्यापासून, टाकाऊ वस्तूंपासून ग्राफिन तयार करण्याचा. What is graffin

    अमेरिकेतील ह्युस्टनमधील राईस विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केळ्याच्या साली, कॉफीच्या बिया, एकदा वापरण्यायोग्य प्लॅस्टिक अशा कचऱ्यापासून ग्राफिन तयार करण्यात यश मिळविले आहे. रसायनशास्त्रज्ञ जेम्स टुर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणातील कचऱ्यापासून ग्राफिनचा थर तयार करण्याची पद्धती शोधून काढली आहे. जगभरातील माणसे ३० ते ४० टक्के अन्न खराब झाल्यामुळे फेकून देतात. त्याच्यासोबत प्लॅस्टिकचा कचरा असतोच. ज्या पदार्थात कार्बनचा अंश असतो, अशा कोणत्याही पदार्थापासून उदा. प्लॅस्टिक कचरा, रबर टायर आदी यांचे रूपांतर ग्राफिनमध्ये करणे शक्य असल्याचा दावा जेम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

    ग्राफिन म्हणजे एका अणूच्या जाडीएवढा कार्बनचा पातळ थर आहे. यातील एक अणू इतर पाच अणूंशी रासायनिक बंधांनी जोडला जातो व त्यामुळे षटकोनी आकृती तयार होते. असे कण एकमेकांना जोडले जाऊन त्यांची पातळ जाळी तयार होते. ग्राफिन पोलादापेक्षा शंभर पटींनी मजबूत आहे; परंतु त्याचे वजन अत्यंत कमी असते. त्याच्या एक चौरस मीटर जाळीचे वजन केवळ ०.७७ ग्रॅम एवढेच असते. ग्राफिन उष्णतेचा सुवाहक आहे. याचा शोध आंद्रे जीम व कॉन्स्टंटाईन नोवोसेलोव्ह यांनी लावला. त्याबद्दल त्यांना २०१० या वर्षासाठीचा नोबेल पुरस्कारही देण्यात आला आहे. इतर पदार्थांबरोबर मिसळून त्या पदार्थांची ताकद ग्राफिनमुळे वाढू शकते. बांधकामासाठीचे काँक्रिट, एलईडी किंवा स्मार्टफोन, बॅटरी, रंग, विविध प्रकारचे सेन्सर आदींमध्ये याचा वापर शक्य आहे. अनेक गोष्टींमध्ये अत्यंत उपयोगी असूनही ग्राफिनचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात सुरू झालेला नाहीये. निर्मितीसाठी लागणारी जास्त किंमत हे त्याचे कारण असू शकते. सध्याच्या पद्धतीने ग्राफिनची निर्मिती करायची झाली तर त्याची किंमत प्रतिटन ६० हजार डॉलर ते दोन लाख डॉलरपर्यंत जाऊ शकते.

    What is graffin

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!