आम्ही देश चालविणार
झेंडे आमचे नाचविणार
रस्त्यांवरून राज्या – राज्यांच्या बॉर्डर वरून रेल्वेच्या पटऱ्यांवरून
जात पंचायतीतून खाप पंचायतीतून
आम्ही देश चालविणार
आम्ही देश चालविणार
मर्जीप्रमाणे आमच्या
अहंकार मोडून तुमचा
असलात तुम्ही 303 पण नकोत आम्हाला तुमच्या पार्लमेंटच्या बिल्डिंगी
ते दिल्लीतल्या सत्तेचे कॉरिडॉर
नकोत आम्हाला तुमच्या व्यवस्था
नको तुमची गुलामगिरी
तुम्ही म्हणा नक्षलवाद फुटीरवाद
आमचे ते स्वातंत्र्य आहे
जबाबदारी तुमची
आम्ही स्वैर आकाशातले पंछी
आम्हाला सीमांचे बंधन नाही
त्या पलिकडे शत्रूच नाही
आम्ही म्हणू तो कायदा
आम्ही म्हणू ती घटना
संविधान रचले आम्ही
त्याची मालकी आमच्याकडे
आम्ही ठरवू तो धर्म
आम्ही ठरवू तो निधर्मी
आम्ही आमच्या मर्जीचे राजे
कायदा आमच्या हातातले प्यादे
आम्ही तो पाळू किंवा न पाळू
तुम्हाला विचारायचा हक्क नाही
हा देश तुमचा नाही
तुम्ही या देशाचे नाही
आम्ही देश चालविणार
रस्त्यावरून राज्या – राज्यांतल्या बॉर्डर वरून
रेल्वेच्या पटऱ्यांवरून
जात आणि खाप पंचायतीतून
आम्ही देश चालविणार
तुम्ही कोण आम्हाला विचारणार?
We will run the country
महत्त्वाच्या बातम्या