• Download App
    मंगळावर जमिनीखाली १.५ किलोमीटर वर पाणी Water 1.5 km below ground on Mars

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : मंगळावर जमिनीखाली १.५ किलोमीटर वर पाणी

    जमिनीला भेदून लहरी पाठवणाऱ्या रडारने मंगळाच्या पृष्ठभागाचं संशोधन सुरु असताना मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर साधारण २० किमी च्या पट्ट्यात जमिनीखाली १.५ किलोमीटर वर पाणी असल्याचं आढळून आलं आहे. रडार जमिनीवर पल्सेस पाठवून त्यावरून रिफ्लेक्ट होणाऱ्या लहरींचा अभ्यास करत असतं.Water 1.5 km below ground on Mars

    जमिनीखाली असलेले बदल जसे बदललेले दगड, अथवा बर्फ, पाणी, पोकळी, गॅसेस ह्यामुळे त्यावरून परावर्तीत होणाऱ्या लहरींमध्ये बदल दिसून येतो. तापमान इतके थंड असताना मंगळाच्या त्या भागात पाणी कसं? ह्याचं उत्तर देतांना वैज्ञानिकांच्या मते मंगळवरच्या जमिनीत असलेल्या मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सोडियम सॉल्ट वितळून ब्राईन तयार झाले असू शकते.

    वर असलेल्या बर्फाच्या आणि जमिनीच्या दाबामुळे अजूनही ते लिक्विड स्वरूपात राहिलं असावं असा अंदाज आहे. आता पाणी मिळालं म्हणून लगेच तिकडे जिवसृष्टी अस्तित्वात असेल असं शक्य नाही किंवा निदान आत्ता सांगणं कठीण आहे. कारण त्यात मिसळलेल्या ह्या सॉल्टच्या प्रमाणामुळे त्यात कोणत्याही प्रकारचे सजीव अगदी मायक्रोबॅक्टेरिया वगैरे अस्तित्वात असण्याची शक्यता धूसर आहे.

    सध्याच्या तंत्रज्ञानाने मंगळावर जमिनीत ड्रिलिंग करून १.५ किलोमीटर खाली असलेल्या ह्या पाण्याचे नुमने तपासणे अशक्य आहे. तसेच मंगळाच वातावरण लक्षात घेता इकडे जीवसृष्टीचा उगम होण्यासाठी अथवा विकसित करण्यासाठी मानवाला अजून अनेक वर्ष जातील असा कयास आहे. या शोधाने काही गोष्टी नक्कीच समोर आणल्या आहेत. एकतर आपण मंगळाच्या जमिनीचा, जमिनीवर न उतरता त्या खाली असलेल्या गोष्टींचा वेध घेऊ शकतो असं तंत्रज्ञान विकसित झालं आहे.

    मंगळावर लिक्विड स्वरुपात पाणी असल्याची पुष्टी झाली आहे. त्यावर अजून पुढचं संशोधन सुरु आहे. मंगळावर वस्ती करण्याच्या एलोन मस्क सारख्या माणसांच्या पंखाना अजून बळ मिळालं आहे. मंगळाच्या जमिनीत अडकलेला कार्बन डायऑक्साईड मोकळा करून मंगळावर वस्ती करण्याचं एलोन मस्क ह्यांच्या स्पेस एक्स चा स्वप्न आहे.

    Water 1.5 km below ground on Mars

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!